रमाई बोले ती, बोल इंदू एकदा | ramai Song
जीव घेण्या यातनांना साहू मी कशी
जाताना बाळा तुला पाहू मी कशी
या काळाने केला मजवर
पुन्हा घात .....
होती ग यातना, मला ग वेदना
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
होती ग यातना, मला ग वेदना
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
बळा तुझे गेले बाबा, परदेशी आणि आली
संकटे ही एकामागे एक ग
मिटवू नकोस डोळे, रडूनी रमाई बोले
डोळे इंदू एकदा तू खोल ग
तोडूनी काळजा, घोटूनी आसवा
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
होती ग यातना, मला ग वेदना
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
भीमसैनिकांनो आता, आठवा त्या यातनांना
तुम्हासाठी साहिले रमाईने
कोटी कोटी लेकरांच्या, साठी स्वतःला इथे
संपताना पाहिले रमाईने
करितो विनंती हा, प्रणय भाऊ रे पुन्हा
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
होती ग यातना, मला ग वेदना
रमाई बोले ती, बोल इंदू एकदा
Comments
Post a Comment