जशी काय सोन्याची सकाळ व

अशी रमाई माही माय व ......



रमाई गोरी गोरी पान व

भिमाची सोन्याची खान व

दीपवल तीन हे अभाय व

अशी रमाई माही माय व .....



सोडवण्या संसाराची कोडी

भरलेली संसाराची गाडी

ओढली गाडी ती ओढाय व 

अशी रमाई माही माय व .....



तीन आम्हाले माया लावली

उन्हात झाली मोठी सावली

नवा कोटी वासरांची गाय व

अशी रमाई माही माय व .....



बंद्यायले आधी जेऊ घातल

सर काही उरल नाही त्यातलं

तशीच भुकेने झोपी जाय व

अशी रमाई माही माय व ......



प्रताप सिंगान हे मानलं

भिमाचं दुःख तीन जाणंल

भिमाच्या दुःखाचा उपाय व

अशी रमाई माही माय व ......

Comments

Popular posts from this blog

Yere bhiva

Rama bol ga majhi rama

Kabira kahe ye jag andha